तटकरे यांच्या घरातील नेत्याचा शिवसेनेत प्रवेश

गुरूवार, 29 ऑगस्ट 2019 (16:08 IST)
राष्ट्रवादी काँग्रेसशी एकनिष्ठ असलेलं तटकरे कुटुंबात काका-पुतण्याचा वाद शिगेला पोहचला असून, राष्ट्रवादीचे खासदार सुनिल तटकरे यांचा पुतण्या आणि श्रीवर्धनचे आमदार अवधूत तटकरे राष्ट्रवादीला सोडत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. तीन सप्टेंबरला अवधूत तटकरे ‘शिवबंधन’ बांधणार आहेत.
 
तटकरे कुटुंबातील वाद पुन्हा जगजाहीर झाला आहे. राष्ट्रवादीसोबतच तटकरे कुटुंबालाही यामुळे मोठे भगदाड पडलं आहे. सुनिल तटकरेंचे बंधू अनिल तटकरे यांचे पुत्र अवधूत तटकरे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत नाराजी उघड केली आहे. गेल्या दिवसांपासून अवधूत यांच्या ‘मातोश्री’वर बैठका सुरु होत्या, अखेर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत तीन तारखेला सेनाप्रवेश करणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती