महाराष्ट्र वंचित आघाडी नावाची वेगळी चूल ५० विधानसभा जागा लढवणार

शनिवार, 24 ऑगस्ट 2019 (10:26 IST)
वंचित बहुजन आघाडीतून बाहेर पडून महाराष्ट्र वंचित आघाडी नावाची वेगळी चूल मांडणार्‍या लक्ष्मण माने यांनी महाराष्ट्रातील ५० विधानसभा जागा लढवण्याचा निर्धार केला आहे. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी हे आमचे नैसर्गिक मित्र असून भाजप, शिवसेना हे प्रतिगामी पक्ष आहेत, त्यांना हरवणे हाच आमचा अजेंडा आहे. कॉंग्रेस, राष्ट्रवादीची नव्या पिढीतली मंडळी चुकली असेल पण त्यामुळे मूळ तत्वज्ञान चुकीचे आहे असे म्हणता येणार नाही. ते विचार नव्या पिढीपर्यंत पोचवता आले नाहीत. मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यातून किमान एक जागा लढवायची आहे. लातूर जिल्ह्यातील दोन जागा आम्ही मागितल्या आहेत. पण त्या जागा नेमक्या कोणत्या आहेत हे आताच सांगता येणार नाही असेही माने यांनी सांगितले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती