लोहगड किल्ला

मंगळवार, 7 फेब्रुवारी 2023 (08:54 IST)
प्राचीन काळापासून या किल्ल्याचे खूप महत्त्व आहे आणि हा किल्ला खंडाळ्याचा व्यापारी मार्ग देखील होता. तब्बल पाच वर्षे हा मुघल साम्राज्याच्या ताब्यात होता. वेगवेगळ्या साम्राज्याने लोहगडावर राज्य केले. या मध्ये प्रामुख्याने सतवाहन, चालुक्य, राष्ट्रकूट, यादव, ब्राह्मण, निजाम, मुघल आणि मराठे ह्यांच्या समावेश आहे.
 
1648 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी पुन्हा लोहगड किल्ला आपल्या ताब्यात घेतला आणि पुरंदरच्या करारामुळे 1665 मध्ये किल्ला मुघलांना द्यावा लागला. 1670 मध्ये छत्रपती शिवाजींनी किल्ला पुन्हा आपल्या ताब्यात घेतला. ते या किल्ल्याचा वापर खजिना लपविण्यासाठी करायचे. पेशवेंच्या काळी नाना फडणवीस काही काळ इथे राहिले आणि त्यांनी बरीच स्मारके बांधविल्या.
 
सध्या हा किल्ला भारत सरकारच्या नियंत्रणात आहे. हा किल्ला महाराष्ट्र राज्यातील अनेक डोंगरी किल्ल्या पैकी एक आहे. लोणावळा हिल स्टेशन आणि पुण्यापासून 52 किमी उत्तर-पश्चिम असलेले लोहगड समुद्रसपाटीपासून 1,033 मीटर उंच आहे. छत्रपती शिवाजी महाराज ह्यांनी दोनदा हा किल्ला जिंकला होता. त्यामुळे ह्याचे महत्व वाढले आहे.

जाण्याचे मार्ग -
लोह गडावर जाण्यासाठी तीन वाटा आहे. पुण्यावरून किंवा मुंबईवरून येताना लोणावळ्याच्या जवळ मळवली स्थानकावर लोकलने उतरून भाजे गावातून लोहगडला जाण्याचा मार्ग धरावा.ती वाट खिंडीत जाते. त्याखिंडीतुन उजवीकडे वळल्यावर लोहगड आणि डावी कडे वळल्यावर विसापूर किल्ला पोहोचतो.
दुसरे मार्ग आहे लोणावळ्याहून दुचाकी किंवा चारचाकी वाहनाने लोहगड जायचे.स्वतःची किंवा खाजगी वाहने करून जाता येत.
तिसरे म्हणजे पवना धरणाजवळून काळे कालोनी मधून पायवाटेने लोहगडी जाता येत.    
 
प्रेक्षणीय स्थळे -
 
1 गणेश दरवाजा- 
सावळे कुटुंब ह्यांना लोह्गडवाडीची पाटीलकी दिली होती. आतील बाजूस शिलालेख आहे.
 
2 नारायण दरवाजा- 
हा दरवाजा नाना फडणवीसांनी बांधला. इथे एक भुयार आहे या मध्ये भात,नाचणी साठवून ठेवायचे.
 
3 हनुमान दरवाजा- 
हा सर्वात प्राचीन दरवाजा आहे. 
 
4 महादरवाजा- 
हा या गडाचा मुख्य दरवाजा आहे. या वर हनुमानाची मूर्ती कोरली आहे. या दारातून आत गेल्यावर एक दर्गा आहे ज्याच्या शेजारी सदर आणि लोहारखान्याचे भग्नावशेष आढळतात. दर्ग्याच्या बाहेर बांधकामाचे चुना बनविण्याची घाणी आहे.उजवीकडे ध्वजस्तंभ आहे. ह्याच्या उजव्या बाजूस लक्ष्मी कोठी आहे. दर्ग्याच्या पुढील बाजूस उजवीकडे शिवमंदिर आहे. पुढे चालून गेल्यावर अष्टकोनी तळे आहे. पिणाच्या पाण्याच्या टाक्या आहेत. लक्ष्मी कोठीच्या पश्चिमेस विंचूकाटा आहे म्हणजे डोंगराची सोंड जे गडावरून बघितल्यावर विंचवाचा नांगी सारखा दिसतो. 
लोहगडाचे वैशिष्टये म्हणजे कड्याच्या टोकावरील बांधलेली चिरेबंदी वाट. ही फार देखणी आणि रेखीव आहे.गडावर गेल्यावर वरील बुरुजावरून सर्व मार्ग दिसतात इथले बांधकाम खूपच सुंदर आणि रेखीव आहे.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती