राष्‍ट्रपती पुत्राकडे 7 कोटींची मालमत्ता

अमरावती मतदार संघातून कॉंग्रेसचे उमेदवार असलेले राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे पुत्र रावसाहेब शेखावत यांच्‍याकडे सुमारे सहा कोटी 68 लाख रुपयांची संपत्ती असल्‍याची माहिती त्यांनी आपल्‍या उमेदवारी अर्जासोबत सादर केली आहे. त्‍यांच्‍या संपत्तीचा हा आकडा त्‍यांचे कट्टर प्रतिस्‍पर्धी आणि कॉंग्रेसमधून फुटून अपक्ष उमेदवारी दाखल केलेले उर्जा राज्यमंत्री सुनील देशमुख यांच्‍या पेक्षा तीन पटीने अधिक आहे.

शेखावत यांनी उमेदवारी अर्जासोबत दिलेल्‍या प्रतिज्ञा पत्रानुसार त्‍यांच्‍याकडे एक कोटी 36 लाख रुपयांची रोकड तर पाच कोटी 32 लाख रुपयांची स्‍थायी मालमत्ता आहे. तर देशमुख यांच्‍याकडे 58 लाख रुपये रोख आणि एक कोटी 85 लाख रुपयांची स्‍थावर मालमत्ता आहे. देशमुख नागपूर पूर्वमधून सातव्‍यांदा विधानसभेची निवडणूक लढवित आहेत.

वेबदुनिया वर वाचा