13 तारखेला महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांसाठी मतदान होत असून, यापूर्वी एका वृत्त वाहिनीने केलेल्या सर्वेक्षणात राज यांच्या मनसेला 12 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज ठाकरेच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरवतील असे या सर्वेक्षणात समोर आल्याचा दावा या वृत्तवाहिनीने केला आहे.
हरयाणात पुन्हा एकदा कॉग्रेस सत्तेवर येण्याची शक्यता असून, महाराष्ट्रात कॉग्रेस राष्ट्रवादीचेच सरकार येणार असल्याचे यात नमूद करण्यात आले आहे.
या निवडणूकीत कॉग्रेसला 88, राष्ट्रवादीला 55 जागा मिळणार असून, 140 जागांवर आघाडीला विजय मिळेल. दुसरीकडे सेनेला 63, तर भाजपला 55 जागा मिळतील अशी शक्यता यात वर्तवण्यात आली आहे.
अशा परिस्थितीत राज ठाकरे यांची भूमिका महत्त्वाची ठरणार असून, ते कोणाकडे जातात यावर पुढील समीकरणं अवलंबून असतील.