नऊ वाजेपर्यंत लागणार पहिला निकाल

तीन राज्यात घेण्यात आलेल्या विधानसभा निवडणुकांसाठीची मतमोजणी आज सकाळी आठ वाजेपासून सुरू होत असून, सकाळी नऊ वाजेपर्यंत पहिला निकाल हाती येणार आहे. अनेक पक्षातील बंडखोरी, दिग्गज नेत्यांच्या नातेवाईकांचे भाग्य, आणि मनसे पासून सेनेपर्यंत साऱ्या पक्षांचे भाग्य ठरवणाऱ्या या निवडणूक निकालांवर आगामी राजकारणाची दिशा ठरणार असल्याने साऱ्यांचे लक्ष
महाराष्ट्रांच्या निकालांकडे लागले आहे.

राज्यातील 288 जागांसाठी घेण्यात आलेल्या निवडणुकांसाठी 267 मतमोजणी केंद्रावर कडेकोट सुरक्षा ठेवण्यात आली असून, दर फेरीचा निकाल जाहीर करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत.

काही खाजगी संस्थांच्या एक्झीट पोलनुसार राज्यात पुन्हा एकदा आघाडीचेच सरकार येण्याची शक्यता असल्याने युतीच्या मनात धडकी भरली आहे. सलग दुसऱ्यांदा विरोधी बाकावर बसण्याची युतीची तयारी नसल्याने निकालांपूर्वीच अपक्ष आणि मनसेच्या उमेदवारांची चाचपणी करून त्यांना आपल्या बाजूने करण्याचे प्रयत्न दोनही आघाड्यांनी सुरू केले आहेत.

वेबदुनिया वर वाचा