दिल्लीप्रमाणे महाराष्ट्राचीही सत्ता काँग्रेसकडे सोपवा : शिंदे

महाराष्ट्राच्या गतीमान प्रगतीसाठी दिल्लीबरोबरच महाराष्ट्राची सत्ता काँग्रेस आघाडीकडे सोपवावी, असे आवाहन केंद्रीय ऊर्जा मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केले. कोल्हापूरातील जवाहर नगर येथे सतेज पाटील यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते.

केंद्रात भाजपा प्रणित सरकार असताना आपण मुख्यमंत्री असताना अटलबिहारी वाजपेयी यांच्याकडे पाचशे कोटींची मदत मागितली होती. मात्र ती मिळाली नाही याची खंत व्यक्त करत शिंदे यांनी याउलट सोनिया गांधी आणि मनमोहन सिंग सरकारने आतापर्यंत महाराष्ट्राला २६ हजार कोटी रुपयांची भरीव मदत दिली आहे असे सांगितले.

राज्यातील वीज भारनियमन पूर्णपणे बंद व्हावे यासाठी केंद्र सरकारने सोलापूर आणि नागपूर येथे दोन मोठे वीज निर्मीतीचे प्रकल्प दिले आहेत. भारत २०२० साली महासत्ता होण्यासाठी महाराष्ट्राही सक्षमपणे त्यामध्ये सहभागी असावा यासाठी महाराष्ट्रात काँग्रेस राष्ट्रवादीचे सरकार आणावे आणि मुंबई - दिल्ली वारी न करता निव्वळ कामाच्या जोरावर राष्ट्रीय काँग्रेसची उमेदवारी मिळवणार्‍या सतेज पाटील यांना विजयी करावे असे आवाहन सुशीलकुमार शिंदे यांनी यावेळी केले.

प्रारंभी उमेदवार विमान आमदार सतेज पाटील यांनी निव्वळ व्यापारी दृष्टीकोनातुनच राजकारण करणार्‍यांना कोल्हापूरचे स्वाभिमानी जनता कदापीही साथ देणार नाही. असे नमुद केले.

वेबदुनिया वर वाचा