गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा नजीक खामतळा या गावातील मतदान केंद्रावर नक्षलवादी हल्ल्याच्या भितीने निवडणूक अधिकारी, कमचारी आणि पोलिस अडकून पडल्यामुळे हेलिकॉप्टरने अतिरीक्त कुमक पाठवावी लागली.
खामतळा परिसरात आज सकाळी नक्षलवाद्यांनी गोळीबारही केला होता. अशा परिस्थितीतही मतदान शांततेत पार पडले. दुपारी ३ वाजता मतदान संपल्यावर खाम तळाजवळच्या नदीपलीकडल्या झुडपात नक्षलवादी दबाव धरून बसले असल्याची आणि त्यांनी रस्ता अडविला असल्याची माहिती मिळाली.
या संदर्भात जिल्हा मुख्यालयाशी संपर्क साधल्यावर लगेच दोन हेलिकॉप्टर्सनी अतिरिक्त कुमक पाठविण्यात आली आणि कर्मचारी अधिकारी आणि पोलिसांना सुखरूप मुख्यालयी पोहोचवण्यात आले अशी माहिती शासकीय सूत्रांनी दिली.