राज्यात 60.37 टक्के मतदान

भाषा

गुरूवार, 15 ऑक्टोबर 2009 (10:53 IST)
राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी 60.37 टक्के मतदान झाले. मतदानाची अधिकृत व अंतिम आकडेवारी आयोगाकडून जाहीर करण्यात आली. तसेच राज्यातील 24 मतदान केंद्रांवर आज (गुरुवारी) फेरमतदान होणार आहे.

सन 2004 च्या निवडणुकीत 63.29 टक्के इतके मतदान झाले होते. मुंबईत शहर जिल्ह्यात 43.23, तर उपनगर जिल्ह्यात 47.16 टक्के इतके मतदान झाले. या निवडणुकीत झालेले मतदान साधारणपणे 1999 मधील मतदानाइतके आहे. त्यावेळी राज्यात 60.80 टक्के मतदान झाले होते. यावर्षी खासगी आस्थापना, दुकाने यांना सुट्टी जाहीर करूनही मुंबईतील मतदानाची टक्केवारी कमी राहिली.

वेबदुनिया वर वाचा