पुरस्काराची रक्कम दुष्काळनिधीला देणार

WD
आजवर मला अनेक पुरस्कार मिळालेत, मात्र आजचा पुरस्कार माझ्यासाठी खूपच खास आहे. कारण हा पुरस्कार लतादीदी यांच्या हस्ते मिळत आहे, अशी भावना सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले यांनी व्यक्त केली. तसेच पुरस्काराची रक्कम दुष्काळग्रस्तांना देणार असल्याचे जाहीर केले.

पार्ले-टिळक विद्यालयात हा पुरस्कार प्रदान सोहळा पार पडला. "हृदयेश आर्टस' या संस्थेच्यावतीने हा "हृदयनाथ मंगेशकर' पुरस्कार देण्यात आला. रुपये एक लाख रोख आणि मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. आशाताई म्हणाल्या की, आम्हा मंगेशकर कुटुंबीयांबद्दल नेहमीच उलट-सुलट चर्चा केल्या गेल्यात. मात्र, हाताची पाचही बोटे फार काळ वेगळी राहू शकत नाहीत. लतादीदींनीही आशा भोसले यांचे कौतुक केले.

दीदी म्हणाल्या की, आशाताईंनी अतिशय बिकट परिस्थितीत यश साध्य केले आहे. त्यांनी आपल्या वाटचालीत कोणाही भावंडाची मदत न घेता यश संपादन केले आहे. या पुरस्कार सोहळ्यासाठी संपूर्ण मंगेशकर भावंडे आणि ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर हेही उपस्थित होते.

वेबदुनिया वर वाचा