दुष्काळी भागात ‘उत्तरा’ची बरसात

WD
मंगळवेढा तालुक्याच्या दुष्काळी दक्षिण भागात शनिवारी रात्री उत्तरा नक्षत्राच्या पावसाने जोरदार बरसात केली. मुसळधार पावसाने गावालगतचे बंधारे तुडुंब भरले आहेत.

गावालगत असलेला बंधारा, उपसरपंच चारू पाटील यांच्या शेतातील बंधारे, विश्रंती नागणे यांच्या शेतातील बंधारा पाण्याने भरला आहे. दुष्काळी भागामध्ये या पावसाळय़ात झालेला हा सर्वात मोठा पाऊस आहे. शनिवारी रात्री भाळवणी परिसराला पावसाने झोडपून काढले. या पावसाने शेतातील ताली, बांध आणि ओढे-नाले प्रथमच भरून वाहू लागले आहेत.

वेबदुनिया वर वाचा