लातूरची तहान भागविण्यासाठी ‘वाघिण’ धावली

सोमवार, 11 एप्रिल 2016 (10:59 IST)
येथील रेल्वेस्थानकावरुन लातूरला पाणीपुरवठा करण्यासाठी ५० टॅँकरची वाघिण वाना झाली आहे. राजस्थानच्या कोटा येथून ५० टँकरची वाघिण रविवारी मिरजेत दाखल झाली.

किमान दहा टँकरमध्ये पाणी भरून सोमवारी ते लातूरला पाठविण्यात येत असल्याचे जीवन प्राधिकरणाच्या अधिकाºयांनी  सांगितले. दरम्यान, लातूरात भीषण पाणीटंचाई असल्याने सरकार याआधी उजनी धरणातून रेल्वेनं लातूरला पाणी देणार होतं. मात्र त्यातही अडचणी आल्याने मिरजची निवड करण्यात आली. एखाद्या जिल्ह्याला रेल्वेने पाणी देण्याची वेळ महाराष्ट्रावर पहिल्यांदाच ओढावली आहे.

वेबदुनिया वर वाचा