पुण्यातील ही ठिकाणे सौंदर्याने परिपूर्ण आहे,आवर्जून भेट द्या

बुधवार, 29 सप्टेंबर 2021 (16:13 IST)
पुण्याला पूर्वीचे ऑक्सफोर्ड देखील म्हणतात.पुण्यात बघण्या सारखे खूप ठिकाण आहे.इथे हवामान खूप छान असतं. इतिहासाप्रमाणे इथे पेशवांचे राजवट होते.इथले सौंदर्य आणि निसर्ग प्रवाशांचे लक्ष वेधतात येथे फिरण्या बरोबरच आपण स्ट्रीट फूडचाही आस्वाद घेऊ शकता. येथे रस्त्यांवर भरपूर खाद्य पदार्थांचे ठिकाण आहे. जेथे बसून खाण्याचा आनंदच आगळा वेगळा आहे. चला तर मग जाणून घेऊया पुण्यात फिरण्याच्या ठिकाणांबद्दल. 
 
1 सिंहगड किल्ला -पुणे शहरापासून सुमारे 25 किमी अंतरावर असलेला हा डोंगरी किल्ला सुमारे 2000 वर्ष जुना आहे. ट्रेकिंगसाठी हे एक चांगले डेस्टिनेशन आहे इथे आपण ट्रेकिंगचा आनंदच घेऊ शकत नाही तर आपण येथून संपूर्ण शहर देखील पाहू शकता. जर आपण इतिहास प्रेमी असाल तर हा किल्ला एकेकाळी मराठा साम्राज्याच्या काळात सक्रिय लष्करी चौकी म्हणून कामी येत होता. 
 
2 राजगड किल्ला-सुमारे 4600 फूट उंचीवर स्थित, राजगड किल्ला 25 वर्षांहून अधिक काळ शिवाजीची राजधानी म्हणून कामी आला आहे. साहसी प्रेमींसाठी हे ठिकाण चांगले ठिकाण ठरू शकते. येथे रात्रभर कॅम्प लावून दुसऱ्या दिवशी सकाळी किल्ला पाहता येतो.
 
3ओशो गार्डन-ओशो गार्डन हे शून्यो फाउंडेशनने तयार केलेले जापा झेन गार्डन आहे. हे ओशो आश्रमाच्या अगदी मागे आहे. या ठिकाणी एकदा भेट देता येईल. या ठिकाणचे सौंदर्य आपल्याला मोहित करेल. 
 
4 एम्प्रेस गार्डन -ही बाग ब्रिटिश राजवटीची आणि त्यांच्या शक्तीची आठवण करून देणारी आहे. ब्रिटिशांनी या बागेला राणी व्हिक्टोरियाचे नाव दिले.
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती