फोटो साभार -सोशल मीडिया
अंबड येथील मत्स्योदरी देवीचे मंदिर हे जालना शहराच्या दक्षीणेस 21 कि.मी. अंतरावर स्थित आहे. देविचे मंदिर हे ज्या टेकडीवर स्थित आहे त्या टेकडीचा आकार मासोळी (मत्स्य) सारखा आहे. त्यामुळे या देवीस मत्स्योदरी देवीचे मंदिर म्हणून ओळखले जाते. हे मंदिर जवळपासच्या क्षेत्रातील अत्यंत जुन्या मंदिरांपैकी एक आहे.ऑक्टोबर महिन्यामध्ये नवरात्र महोत्सवाच्या निमीत्ताने दरवर्षी या मंदिरामध्ये मोठी यात्रा भरते
एका आख्यायिकेनुसार, अंबड शहराची स्थापना ऋषी अंबड यांनी केली होती. हे एकेकाळी हिंदूंचे राजा होते. हे आपल्या राजवटीत आपली जबाबदारी सोडून पळून जाऊन एका गुहेत जाऊन लपून बसले होते.जेणे करून सर्व मोहमायाचा त्याग करता येईल. नवरात्रोत्सवात या मंदिरात मोठी यात्रा भरते.