फोटो साभार -सोशल मीडिया
देवी चतुःशृंगीचे मंदिर पश्चिम पुणे येथे एका टेकडीवर आहे. पुणे शहरातील ही मुख्य देवी आहे.या देवीला महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती, अंबरेश्वरी,आणि चतुःशृंगी या नावाने ओळखले जाते. हे मंदिर निसर्गाच्या मधोमध आहे.हे मंदिर 90 फूट उंच आणि 125 फूट रुंद आहे.हे मंदिर खूप जागृत आहे आणि देवी नवसाला पावणारी आहे. हे मंदिर उंच टेकडीवर आहे आणि मंदिरात जाण्यासाठी 100 पायऱ्या आहे. इथेच देवी दुर्गा आणि गणपतीचे मंदिर देखील आहे.जवळच वेताळ मंदिर देखील आहे. हे खूप मोठे मंदिर आहे.हे उंचीवर असल्यामुळे खूप सुंदर दिसते.डोंगरावर असल्यामुळे हे खूप आकर्षक दिसते.यामुळेच कदाचित वर्षभर भाविकांची गर्दी ओसंडून दिसते.
विमान मार्गे- लोहगाव विमानतळ,छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमान तळ, गांधीनगर विमानतळ आणि कोल्हापूर विमानतळ इथून जवळ आहे.