सर्वांना मोहवून टाकणारे. उंच पर्वरांगातून निघालेल्या चिंचोळ्या वाटा, खळाळत कोसळणारे धबधबे, लांबच लांब पसरलेला दर्यांयांमधील प्रदेश आणि चोहोबाजूंनी पसरलेल्या हिरव्यागार रांगांमध्ये पसरलेली टेबल लँड. या टेबल लँडच्या चोहीकडून वारे प्रचंड वेगाने वाहतात.
मान्सून संपल्यावर गुलाबी थंडीत मोकळ्या आभाळाखाली तळ्याच्या काठी मस्त तंबू ठोकूनं शेकोटी पेटवायची अन रात्रीचं सौंदर्य न्याहाळत, चांदण्यांशी गूजगोष्टी करत रात्र घालवण्याचा कार्यक्रमही भन्नाटच. येथूनच जवळच सात किलोमीटरवर हरिश्चंद्र गड आहे.