महाराष्ट्रातील काही प्रेक्षणीय स्थळ येथे नक्की जाऊन या

मंगळवार, 22 जून 2021 (22:17 IST)
महाराष्ट्र भारताच्या दक्षिण मध्यभागी आहे.त्याची राजधानी मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी म्हणून देखील ओळखली जाते आणि येथील पुणे शहर देखील भारताच्या महानगरांमध्ये गणले जाते.पुणे हे भारतातील सहावे क्रमांकाचे मोठे शहर आहे.या व्यतिरिक्त येथे अनेक पर्यटन शहरे आहेत. 
 
 

1 अमरावती-महाराष्ट्राच्या ईशान्य दिशेला वसलेले अमरावती हे इंद्राचे शहर मानले जाते, बरीच ऐतिहासिक मंदिरे आणि अभयारण्य हे इथले खास पर्यटनस्थळ आहे. देवी अंबा,भगवान कृष्ण आणि वेंकटेश्वर मंदिरे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत.अमरावतीचा  बीर आणि शक्कर तलाव बर्‍यापैकी लोकप्रिय आहे.अमरावती जिल्ह्यातील चिकलधारा आणि धारणी तहसीलमधील असलेले टायगर रिजर्व्ह हे 1597चौ.कि.मी. क्षेत्रात पसरलेल आहे. 
 
 

2 नाशिक- हे नाशिक म्हणूनही ओळखले जाते. हे महाराष्ट्र राज्याच्या उत्तर-पश्चिमेस आहे. हे शहर मुख्यतः हिंदू तीर्थक्षेत्राचे एक प्रमुख केंद्र.आहे. नाशिकमध्ये लागणारा कुंभमेळा हे शहरातील आकर्षणाचे सर्वात मोठे केंद्र आहे .इथे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक त्र्यंबकेश्वर मंदिर देखील आहे. 
 
 

3. पुणे-पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आणि 'दख्खनची राणी' म्हणून देखील ओळखले जाते. पुण्यात शनिवारवाडा महाल आहे जे पेशव्याचे निवासस्थळ होते.या राजवाड्याचा पाया बाजीराव  पहिले यांनी इ.स.1730 मध्ये घातला होता.इथे आगाखान महाल देखील आहे.हे इमाम सुलतान मोहम्मद शाह आगाखान तृतिय यांनी 1892 मध्ये बांधले होते.1969 मध्ये,आगाखान चवथे यांनी हे महाल भारत सरकारच्या ताब्यात दिले. 
 

4 मुंबई-मुंबई पूर्वी बॉंबे म्हणून ओळखली जात असे.भारताच्या चार प्रमुख महानगरांपैकी एक असण्या व्यतिरिक्त ही महाराष्ट्राची राजधानी देखील आहे.याला भारताची आर्थिक राजधानी देखील म्हटले जाते. देशातील प्रमुख आर्थिक आणि संचार केंद्रे येथे आहेत.गेट वे ऑफ इंडिया,हाजी अली,जुहू बीच,जोगेश्वरी गुहा,हँगिंग गार्डन, सिद्धिविनायक मंदिर,मरीन ड्राईव्ह येथे फिरायला जायलाच हवे. 
 
 

5  रत्नागिरी- समुद्राभोवती वेढलेले,बाल गंगाधर टिळकांचे हे जन्म स्थान, भारताच्या महाराष्ट्र राज्याच्या दक्षिण-पश्चिम भागात अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेले आहे.हा कोकण क्षेत्राचा एक भाग आहे. इथे खूप लांब समुद्री किनारा आहे .येथे बरीच बंदरे देखीलआहेत.रत्नागिरीमध्ये दोन प्रचंड बौद्ध मठ होते,त्या मठा व्यतिरिक्त,सहा मंदिरांचे अवशेष, हजारो लहान स्तूप,1386 मुद्रा,असंख्य शिल्प इत्यादी आढळल्या आहेत,थीवा महाल, रत्नागिरी किल्ला येथे आकर्षणाचे केंद्र आहे.
 

6 लोणावळा-हे हिल स्टेशन आहे.हे सह्याद्रीच्या टेकड्यांचे रत्न म्हणून या नावाने देखील ओळखले जाते. हे निरोगी पर्यटन स्थळ मानले जाते.हे समुद्रसपाटीपासून 625 मीटरउंचीवर आहे.हे  मुंबई आणि पुण्याचे प्रवेशद्वार म्हणून देखील मानले जाते.लोणावळ्याच्या मुख्य बाजाराच्या मागे वुड पार्क आहे.हे सेंद्रिय उद्यान आहे.या उद्यानाच्या उलट बाजूस एक जुनी ख्रिश्चन स्मशानभूमी आहे.त्यातील बरीच कबर100 वर्षे जुनी आहेत.
 
 

7 औरंगाबाद-औरंगाबाद जगात अजिंठा आणि एलोरा या प्रसिद्ध बौद्ध लेण्यांसाठी ओळखले जाते.या लेण्यांचा समावेश जागतिक वारसा वर्ल्ड हेरिटेज मध्ये करण्यात आला आहे.मध्ययुगीन काळात औरंगाबादचे भारतात महत्त्वपूर्ण स्थान होते.औरंगजेबाने आपल्या आयुष्यातील उत्तरार्ध काळ येथे घालविला आणि औरंगजेबाचा मृत्यू इथेच झाला.औरंगजेबची पत्नी रबिया दुराणी यांचीही थडगे इथेच आहे आणि पाणचक्की देखील एक चांगले प्रेक्षणीय पर्यटन स्थळ आहे. 
 
 

8 दौलताबाद-हे शहर औरंगाबाद जिल्ह्यात आहे. याला देवगिरी असेही म्हणतात. दौलताबादमध्ये बर्‍याच ऐतिहासिक इमारती आहेत ज्या बघण्यासारख्या आहेत.या इमारतीं मध्ये जामा मशिद,चांद मीनार,चिनी महल आणि दौलताबाद किल्ला समाविष्ट आहे. 
 
 

9 महाबळेश्वर-हे महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात आहे. महाबळेश्वर हिल स्टेशन पश्चिम घाटांच्या श्रेणीमध्ये आहे. येथे कृष्णा भाई मंदिर, मंकी पॉईंट,वेन्ना लेक,लिंगमाला धबधबा,केट्स पॉईंट,विल्सन पॉईंट,महाबळेश्वर जवळील प्रतापगड किल्ला येथे भेट देण्यासारखे आहे. 
 
 
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती