गोनींचा किल्ला

जांभीवलीहून या किल्ल्याला जावे लागते. हा प्रवास लोणावळ्याहून सुरू होतो. बरोबर मार्गदर्शक होता. आम्ही आठ-दहा जण निघालो होतो. चालताना विश्रंतीसाठी एक-दोन वेळा मोकळ्या टेकडय़ांवर थांबून पहाटे तीनच्या सुमारास जंगलाच्या अंतर्भागात पोहोचलो. प्रत्येकाजवळ  टॉर्च होता. विसाव्यासाठी इथे थोडी मोकळी जागा होती. बहुतेकांजवळ कॅरी, मॅट, स्लिपिंग बॅग्ज असा सुसज्ज सरंजाम होता. थोडेच लोक फक्त चादर घेऊन आले होते. काहींनी काटक्या, लाकडे गोळा करून शेकोटी पेटविली. सर्वानी या ठिकाणी झोप घेतली.
 
सकाळी ब्रेड-बटर जॅम अशी न्याहरी करून पुढच्या वाटेला लागलो. लोणावळा-भीमाशंकर ही वाट उजव्या हाताला जंगलातून खुणावत होती. तिथून पुढे गेल्यावर गावकर्‍यांनी लावलेली पाटी दिसली. ‘ढाक-बहिरी पवित्र गुहा-स्त्रिांना प्रवेश नाही’ पुढे एका वळणाने अशा जागी नेले की तिथून समोर डोळे फिरवून टाकणारी खोल दरी दिसत होती आणि दगडाच्या बेचक्यातील वाट एवढी निमुळती आणि खोल होती की तिथून सॅकसहित उतरणे शक्य नव्हते. एकजण खाली गेला आणि मध्ये साखळी करून सगळंच सॅक प्रथम खाली पाठविल्या आणि नंतर सगळे उतरले.
 
इथून पुढे खरा कस लागणार होता. उजव्या हाताला एक छोटीशी गुहा दिसली. तातडीने पुढे जाला हवे होते. दगड तापलवर ते पार करणे अशक्य असते. उजवीकडे प्रचंड कातळ आणि डावीकडे खोल दरी. अरुंद वाट पार करताना कमालीच एकाग्रतेची आवश्कता होती.
 
अति कष्टाने बहिरीच गुहेमध्ये प्रवेश केला. येथे बहिरीदेवाची, श्रीगणेशाची आणि भवानीदेवीची मूर्ती आहे. समोर दिसणारे विहंगम पर्वत बघताना भान हरपून गेले.
 
ठाकरांच्या या बहिरी देवाला नतमस्तक होऊन एका अवघड वाटेने 2700 फूट उंचीवर पोहोचल्यावर समोर राजमाचीचे श्रीवर्धन, मनरंजन, माणिकगड, कर्नाळा, भीमाशंकर, ड्युक्सनोज, विसापूर सगळेजण हात जोडून आम्हाला दर्शन देत होते.
 
हवा अगदी स्वच्छ होती. परतीच्या प्रवासात अंधारातली गुंफा आणि भूतकाळातला किल्ला चिरंतन आठवणीत राहिला. गोनींचा किल्ला अशीही या किल्ल्याची ओळख आहे.
 
म. अ. खाडिलकर 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती