आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या अर्थसंकल्पात अनेक मोठ्या आणि महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या. महिलांना दर महिन्याला 1500 रुपये, 47 लाख शेतकऱ्यांची वीज बिले माफ मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'ची घोषणा या अर्थसंकल्पात करण्यात आली. यावर आता उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारवर निशाणा साधला आहे.ते म्हणाले, जब चादर लगी फटने तब खैरात लगे बाटने असे म्हणत खोचक टोला लगावला आहे.
या अर्थसंकल्पाबाबत जयंत पाटील म्हणाले की, सरकारने निवडणुकीपूर्वी काही घटकांना आकर्षित करण्याची शेवटची खेळी केली आहे. ते म्हणाले, "आज सरकारने पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी केले आहेत. आम्ही त्याचे स्वागत करतो. अर्थसंकल्पात मोठमोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. पण एवढा पैसा येणार कुठून. मतदारांना आकर्षित करण्यासाठी सरकारने अनेक घोषणा केल्या आहेत पण या साठी पैसे येणार कुठून ? असं म्हणत खोचक टीका केली आहे.
यंदाच्या महायुतीच्या अर्थसंकल्पात महिलांकडे आणि शेतकऱ्यांकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे. अर्थसंकल्पात महिलांसाठी मुख्यमंत्री लाडली बहीण योजना जाहीर केली असून या योजनेत आर्थिक दुर्बल महिलांना सरकारकडून दरमहा 1500 रुपये दिले जाणार आहेत. याशिवाय सरकारकडून महिलांना वर्षभरात तीन एलपीजी गॅस सिलिंडर मोफत दिले जाणार आहेत.