महाराष्ट्र अर्थसंकल्प 2023 : शेतकऱ्यांसाठी घोषणा, पीक विमा योजनेसाठी भरावा लागणार फक्त 1 रुपया
गुरूवार, 9 मार्च 2023 (14:28 IST)
राज्याचा अर्थसंकल्प आज 9 मार्चला अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस मांडत आहे.
शिंदे- फडणवीस सरकार अस्तित्वात आल्यानंतरचा हा पहिला अर्थसंकल्प आहे. त्यामुळे या अर्थसंकल्पाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
अर्थसंकल्पात शिवराज्याभिषेकासाठी 350 कोटींच्या निधीची घोषणा करण्यात आली आहे.
फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी घोषणा करताना म्हटलं की, जून 2015 मध्ये मागेल त्याला शेततळे योजनेअंतर्गत मागेल त्याला फळबाग, शेततळे इत्यादी देण्यात येईल. त्यासाठी एक हजार कोटी रूपयांचा निधी देण्यात आला आहे.
शेतकऱ्यांसाठी करण्यात आलेल्या अन्य घोषणा
शाश्वत शेती समृध्द शेती
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मदत केली जाईल. नमो शेतकरी महायोजना
प्रतिवर्ष केंद्र सरकार 6 हजार देतं त्यात अजून 6 हजार यांची भर घालतो. याचा लाभ 1 कोटी 15 लाख शेतकऱ्यांना होणार
पीक विमा योजनेसाठी शेतकऱ्याला फक्त १ रूपया भरावा लागेल. शेतकऱ्याच्या वतीचा हफ्ता सरकार भरेल.
महाकृषी विकास अभियान जाहीर
एकात्मिक पीक आधारित प्रकल्प आराखडा तयार करणार
5 वर्षांत 3000 कोटी रुपये उपलब्ध करून देणार.
शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध होण्यासाठी सौरऊर्जा पंप देण्यात येतील
'लेक लाडकी' योजना नव्या स्वरूपात
लाडकी लेक मी संतांची, मजवरी कृपा बहुतांची... असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी 'लेक लाडकी' योजना नव्या स्वरूपात मांडली. मुलींच्या सक्षमीकरणासाठी ही योजना आहे.
पिवळ्या आणि केशरी रेशनकार्डधारक कुटुंबांतील मुलींना लाभ
जन्मानंतर मुलीला 5000 रुपये
पहिलीत 4000 रुपये, सहावीत 6000 रुपये
अकरावीत 8000 रुपये
मुलगी 18 वर्षांची झाल्यावर 75,000 रुपये
महिलांसाठी योजना
- राज्य परिवहन महामंडळाच्या बससेवेत तिकिटदरात महिलांना 50 टक्के सवलत
- चौथे सर्वसमावेशक महिला धोरण जाहीर करणार
-महिला बचत गटांच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यात बांबू क्लस्टर
- कोल्हापूर जिल्ह्यात कोल्हापुरी चप्पल क्लस्टर
-मुंबईत महिला युनिटी मॉलची स्थापना
-महिला सुरक्षा, सुविधाजनक प्रवासासाठी महिला केंद्रीत पर्यटन धोरण
- माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियानात 4 कोटी महिला-मुलींची आरोग्य तपासणी, औषधोपचार
-शहरी भागात नोकरीसाठी आलेल्या महिलांसाठी केंद्राच्या मदतीने 50 वसतीगृहांची निर्मिती
- अडचणीतील महिलांसाठी, लैंगिक शोषणापासून मुक्त केलेल्या महिलांसाठी, कौटुंबिक समस्याग्रस्त महिलांसाठी स्वाधार आणि उज्वला या दोन योजनांचे एकत्रीकरण करुन केंद्राच्या मदतीने 'शक्तीसदन' ही नवीन योजना.
- या योजनेत पीडित महिलांना आश्रय, विधी सेवा, आरोग्यसेवा, समुपदेशन इत्यादी सेवा
-या योजनेत 50 नवीन 'शक्तीसदन' निर्माण करणार
आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ
-आशा स्वयंसेविकांचे मानधन 3500 वरुन 5000 रुपये
-गटप्रवर्तकांचे मानधन 4700 वरुन 6200 रुपये
-अंगणवाडी सेविकांचे मानधन 8325 वरुन 10,000 रुपये
- मिनी अंगणवाडी सेविकांचे मानधन 5975 वरुन 7200 रुपये
- मानसिक अस्वास्थ आणि व्यसनाधीनतेची वाढती समस्या पाहता जालना, भिवंडी, पुणे, नागपूर येथे नवीन व्यसनमुक्ती केंद्रे
पायाभूत क्षेत्रातील महत्त्वाच्या घोषणा
-१ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचं राज्याचं लक्ष्य आहे. यासाठी सिंदखेड राजापासून ते शेगावपर्यंत चार पदरी रस्ता बांधणार.
- पुण्यात २७ हजार कोटी खर्चून रिंग रोडचं काम सुरू आहे.
-१४२२५ कोटी रूपये रस्ते व पुलासाठी देण्यात येतील.
-सार्वजनिक बांधकाम विभागास १९४९१ कोटी रूपये देण्यात येतील
- सर्वांसाठी घरे... या एका नवी घोषणा जाहीर करण्यात आली आहे. यावर्षी 10 लाख घरांचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम प्रस्तावित आहे.
-इतर मागासवर्गीयांसाठी 3 वर्षांत 10 लाख घरांची 'मोदी आवास घरकुल योजना' राबवण्यात येईल.
- प्रधानमंत्री आवास योजना: 4 लाख घरे (2.5 लाख घरे अनुसूचित जाती-जमाती, 1.5 लाख इतर प्रवर्ग)
- रमाई आवास : 1.5 लाख घरे/1800 कोटी रुपये (किमान 25 हजार घरे मातंग समाजासाठी)
- शबरी, पारधी, आदिम आवास : 1 लाख घरे/1200 कोटी रुपये
- यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत: 50,000 घरे/600 कोटी (25,000 घरे विमुक्त जाती-भटक्या जमातींसाठी धनगर : 25,000 घरे)
- इतर मागासवर्गीयांसाठी नवीन घरकुल योजना : मोदी आवास घरकुल योजना : 3 वर्षांत 10 लाख घरे /12,000 कोटी रुपये.
सार्वजनिक वाहतूक आणि हवाई सेवा क्षेत्रातील तरतुदी
- शिर्डी विमानतळावर नवे प्रवासी टर्मिनल: 527 कोटी खर्चून उभारणार
- छत्रपती संभाजीनगर विमानतळ भूसंपादनासाठी : 734 कोटी
- नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विस्तार
- पुरंदर येथे नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ
- नागपुरातील मिहान प्रकल्पासाठी 100 कोटी
- बेलोरा (अमरावती), शिवणी (अकोला) येथे विमानतळ विकासाची कामे
- मुंबईत 337 कि.मी. मेट्रोचे जाळे/46 कि.मी. खुला/आणखी 50 कि.मी. यावर्षी खुला.
- मुंबई मेट्रो 10 : गायमुख ते शिवाजी चौक मीरा रोड/9.2 कि.मी/4476 कोटी.- मुंबई मेट्रो 11 : वडाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस/12.77 कि.मी/8739 कोटी रुपये.
- मुंबई मेट्रो 12 : कल्याण ते तळोजा/20.75 कि.मी/5865 कोटी रुपये.
- नागपूर मेट्रोचा दुसरा टप्पा: 43.80 कि.मी./6708 कोटी.
- पुणे मेट्रो : 8313 कोटींची कामे प्रगतीपथावर.
- अन्य नवीन प्रकल्प : ठाणे वर्तुळाकार मेट्रो, नाशिक निओ मेट्रो, पुणे मेट्रोच्या पिंपरी-चिंचवड ते निगडी कॉरिडॉर आणि स्वारगेट ते कात्रज मेट्रो. - नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वेला निधी.
- सोलापूर-तुळजापूर-धाराशिव ब्रॉडगेज : 84 कि.मी/452 कोटी रुपये.
- नांदेड-बिदर, फलटण-पंढरपूर, खामगाव-जालना, वरोरा-चिमूर-कांपा या 4 प्रकल्पांना 50 टक्के राज्यहिस्सा देणार.
- सेतूबंधनअंतर्गत राज्य रेल्वेफाटक मुक्त करण्यासाठी 25 नवीन उड्डाणपूल.
- 100 बसस्थानकांचे आधुनिकीकरण आणि पुनर्बांधणीसाठी सुमारे 400 कोटी