मिळालेल्या माहितीनुसार तीन दिवसांपूर्वी मल्लिकार्जुन खरगे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे नाव न घेता त्यांच्यावर टिप्पणी केली होती. ते म्हणाले होते की, काही लोक भगवे कपडे घालून राजकारणात आले असून देशात द्वेष पसरवत आहे, असे खरगे म्हणाले होते.
यावर योगी म्हणाले की, गेल्या तीन दिवसांपासून मी खरगे यांचे म्हणणे ऐकत आहे. मी योगी आहे आणि माझ्यासाठी राष्ट्र सर्वोच्च आहे. तुमच्यासाठी काँग्रेसचे तुष्टीकरणाचे राजकारण सर्वोच्च आहे. काँग्रेसचे तुष्टीकरण धोरण तुमच्यासाठी पहिले आहे, त्यामुळेच तुम्हाला खरे बोलता येत नाही, असा टोला योगिनीं खरगेंना लगावला.