मिळालेल्या माहितीनुसार काँग्रेसचे मुंबई प्रदेश कार्यालय राजीव गांधी भवन येथे राज्यसभेतील उपनेते प्रमोद तिवारी यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार आणि भाजपवर गंभीर आरोप केले आहे. प्रमोद तिवारी म्हणाले की, इंग्रजांनी भारतावर राज्य करण्यासाठी फूट पाडा आणि राज्य करा या धोरणाचा वापर केला. तसेच जात आणि धर्माच्या आधारे देशाची फाळणी करून आपल्या जागा मजबूत करण्यासाठी भाजप त्याच धोरणाचा वापर करत आहे.
काँग्रेस नेते प्रमोद तिवारी म्हणाले की, भाजपने सत्तेसाठी ठाकरे आणि पवारांची घरे फोडली. भाजपकडे ब्रिटिशांच्या धोरणाचाच डीएनए आहे. भाजप हा कुटुंबे तोडणारा पक्ष आहे. मोदी-शहांनी एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मदतीने महाराष्ट्राचे मोठे प्रकल्प एक एक करून गुजरातमध्ये नेले, असा आरोप त्यांनी केला. शिंदे, फडणवीस, अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या हिताचा विचार न करता महाराष्ट्राचा त्याग केला असे देखील प्रमोद तिवारी म्हणाले.