ते म्हणाले, राजुयातील विद्यार्थिनींना मोफत शिक्षणाची व्यवस्था राज्यसरकार करणार आहे. या व्यतिरिक्त मुंबईतील अडाणी प्रकल्प रद्द करणे, शेतकऱ्यांना एमएसपी देणे, पोलिसांची भरती करणे आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किमती स्थिर करण्याचे आश्वासन त्यांनी दिली.
मुंबईतील अडाणी प्रकल्प रद्द करून धारावीवासीयांना उद्योगासह घरे दिले जातील.
आगामी काळात सत्तेत आल्यास महाराष्ट्राच्या मातीच्या सुपुत्रांना धारावी आणि मुंबई परिसरात परवडणारी घरे देऊ, असे ठाकरे म्हणाले.
जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेऊ. आमची सरकार आल्यावर पुढील पाच वर्षे महाराष्ट्रात जीवनावश्यक वस्तू, डाळ, तांदूळ, साखर, तेल या वस्तूंचे भाव स्थिर करू.