महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर महायुतीमध्ये राजकीय पेच वाढला आहे. शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या नेत्यांना भाजपसोबत जागावाटप लवकरात लवकर निश्चित करायचे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज संध्याकाळी दिल्लीला भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी जागावाटपाच्या मुद्द्यावर बोलणी करणार.
राष्ट्रवादीचे अजित पवार, शिवसेनेचे एकनाथ शिंदे आणि भाजपचे देवेंद्र फडणवीस हे बुधवारी दिल्लीत भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत बैठक घेऊ शकतात,
वृत्तानुसार, भाजप 140-150 जागांवर निवडणूक लढवू शकते. शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना 80 तर राष्ट्रवादी 40-55 जागांवर निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.यावर अद्याप काहीही निर्णय झालेला नाही.