आता मुंबईत होणारी महायुतीची बैठक रद्द करण्यात आली असून प्रथम भाजपच्या विधीमंडळ पक्षाची बैठक होणार आहे त्यात भाजप विधिमंडळाच्या पक्षाच्या नेत्याची निवड होणार आहे. नंतर महायुतीची बैठक होणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. दिल्लीहून येणाऱ्या एक डिसेंबरला दोन्ही निरीक्षकांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांची घोषणा केली जाणार आहे.