महाराष्ट्र विधानसभा निवडणुक: महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक 20 नोव्हेंबरला होणार असून, मतमोजणी 23 नोव्हेंबरला रोजी होणार आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसने बंडखोर उमेदवारांवर मोठी कारवाई केली आहे.
काँग्रेसने आतापर्यंत एकूण 28 बंडखोर उमेदवारांना निलंबित केले आहे. हे नेते आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी (एमव्हीए) आघाडीच्या अधिकृत उमेदवारांविरुद्ध लढत होते. त्यामुळे पक्षाने त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली आहे. MVA मध्ये काँग्रेस, शिवसेना (UBT) आणि NCP (शरद पवार) यांचा समावेश आहे.