महाराष्ट्राच्या सत्तेत मुस्लिमांनाही वाटा मिळण्याची बाबा सिद्दीकींची मागणी

बुधवार, 11 सप्टेंबर 2024 (18:18 IST)
बीड शहरात आयोजित अल्पसंख्यांक सभेच्या निमित्ताने बाबा सिद्दीकी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला त्यांनी या वेळी विरोधकांवर टीका केली. ते म्हणाले, जेव्हा वफ्फ बोर्ड विधेयक संसदेत मांडण्यात आले तेव्हा राज्यातील विरोधी पक्षाचे नऊ खासदार विरोध करत होते. दिल्लीतील वफ्फ विधेयकाबाबत ते महत्वाचे नव्हते का? वफ्फ बोर्डाला 100 टक्के विरोध व्हायला हवा असे ते म्हणाले. 

यावेळी बोलताना त्यांनी भाजप नेते नितेश राणे यांच्यावर देखील टीका केली. ते म्हणाले, नितेश राणे वरिष्ठांना खुश करण्यासाठी मुसलमानांसाठी अशा प्रकारची विधाने देत आहे. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. 

सिद्दीकी यांनी काँग्रेसचा राजीनामा देऊन त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.सिद्दीकी हा मुंबईचा मोठा अल्पसंख्याक चेहरा आहे. 1999, 2004 आणि 2009 मध्ये ते सलग तीन वेळा आमदार होते. त्यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री म्हणूनही काम पाहिले आहे.
Edited by - Priya Dixit 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती