वरळीतून आदित्य ठाकरेंची उमेदवारी दाखल

गुरूवार, 24 ऑक्टोबर 2024 (14:59 IST)
महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी प्रक्रिया सुरू असून गुरुवारी शिवसेना यूबीटी नेते आदित्य ठाकरे यांनी मुंबईच्या वरळी मतदारसंघातून उमेदवारी दाखल केली आहे. यावेळी त्यांनी रोड शो आपली ताकद दाखवली.
 
मिळालेल्या माहितीनुसार रोड शो दरम्यान आदित्य ठाकरे म्हणाले की, 'मला विश्वास आहे की वरळीतील लोक माझ्यावर प्रेम करतील आणि आशीर्वाद दिखील देतील. महाराष्ट्रात आम्हीच सरकार स्थापन करणार आहोत, हे निश्चित आहे. महाविकास आघाडीतील जागावाटपाबाबत ते म्हणाले की, अजून चर्चा होत आहे, पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकनाथ शिंदे आणि भाजपचा पराभव करायचा आहे कारण त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र लुटला आहे असे देखील आदित्य ठाकरे म्हणाले. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती