आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. राजकीय पक्षांचे नेते एक मेकांवर शाब्दिक हल्ले करत आहे. दरम्यान सपाचे उमेदवार अबू आझमी यांनी नवाब मालिकांवर निशाणा साधत म्हणाले. हे आमच्या तुकड्यांवर वाढले आता ते आमच्याशी लढायला आले आहे. अबू आझमी हे मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघातून तीन वेळा आमदार होते. त्यांच्या विरोधात नवाब मलिक हे लढत आहे.
अबू आझमी रविवारी त्यांच्या विधानसभा मतदारसंघात जाहीर सभेला संबोधित करत होते. यावेळी त्यांनी महायुती सरकार आणि राष्ट्रवादीचे अजित पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला. नवाब मलिकसाठी ते म्हणाले की, जे माझ्या तुकड्यांवर मोठे झाले तेच आता माझ्याविरुद्ध लढत आहेत. ज्याने आपल्या जावयाला ड्रग्जच्या प्रकरणात नेहमीच संरक्षण दिले तेच आता अंमली पदार्थांचे व्यसन संपवण्याची भाषा करत आहेत. ते पुढे म्हणाले की कुठे राजा भोज आणि कुठे गंगू तेली.
नवाब मलिक यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात सपा मधून केली असून 1996 मध्ये नवाब मलिक यांनी अबू आझमी यांच्या नेतृत्वाखाली नेहरू नगर मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि विजय मिळवला. नंतर 2001 मध्ये सपाने नवाब मलिक यांना निलंबित केले. यानंतर त्यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 2009 आणि 2019 च्या निवडणुकीत अणुशक्ती नगर मतदारसंघातून निवडणूक जिंकून ते आमदार झाले.