महाविकास आघाडीत 130 जागांच्या वाटपावर झाले एकमत

शनिवार, 21 सप्टेंबर 2024 (09:20 IST)
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक या वर्षाच्या अखेरीस होणार असून अद्याप तारखा जाहीर केल्या नाही. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत सर्वच पक्षांमध्ये जागावाटपाची चर्चा रंगली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महाविकास आघाडीच्या (एमव्हीए) बैठकीत 130 जागांच्या वाटपावर एकमत झाले आहे.

महाविकास आघाडी मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचन्द्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेस पक्षाचा समावेश आहे. 
 
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विदर्भ, मराठवाडा, मुंबई आणि कोकणातील काही जागांवर महाविकास आघाडीमध्ये वाद आहे. जागावाटपात प्रत्येक जिल्ह्याच्या स्थानिक पातळीवरील राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे. त्यामुळे जागा वाटपात विलंब होत आहे.

आपली पारंपारिक व्होट बँक पुन्हा मिळवण्यासाठी काँग्रेस मुंबईतील अल्पसंख्याक बहुल जागांवर लक्ष ठेवत आहे. तिन्ही पक्षांनी निवडणूक समीकरणांवर कामाला सुरुवात केली आहे. 

या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मुंबईत जास्त जागा जिंकण्याची आशा आहे. काँग्रेस लोकसभा निवडणुकीत 13  जागांसह राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. उद्धव ठाकरे शिवसेनेने 9  जागा जिंकल्या होत्या तर राष्ट्रवादी काँग्रेस ने 8  जागा जिंकल्या.
Edited By - Priya Dixit 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती