हरिद्वार कुंभ मेळावा 2021 विशेष: आपण देखील कुंभ मेळाव्यात जात आहात तर या गोष्टींना लक्षात ठेवा
बुधवार, 13 जानेवारी 2021 (22:43 IST)
1 वर्ष 2020 पासून सुरू असलेल्या कोविड-19 संसर्गाचा प्रादुर्भाव अद्याप संपलेला नाही. म्हणून कुंभ 2021 मध्ये या संसर्गापासून बचाव करण्यासाठी जे काही शासकीय नियम आणि कायदे सांगितले आहे त्यांचा काटेकोर पालन करावा.
2 हॉटेल अगोदरच बुक करा आणि हॉटेलच्या खोलीच्या स्वच्छतेची खास काळजी घ्या. त्याच हॉटेल मध्ये थांबा जिथे स्वच्छतेची काळजी घेतात आणि खोली चांगल्या प्रकारे सेनेटाईझ करतात.
3 तोंडावर मास्क लावा आणि दिवसातून किमान 3 वेळा मास्क बदला कारण वर्दळीच्या ठिकाणी संसर्ग पसरण्याचा धोका सर्वात जास्त असतो.
4 स्वच्छ कपडे घाला आणि जे कपडे घालून आपण बाहेर गेला आहात त्यांना पुन्हा वापरू नये.
5 नदी मध्ये स्नान केल्यावर लगेच स्वच्छ आणि गरम पाण्याने आंघोळ करावी.