Assembly election 2023 : मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये आज मतदान

शुक्रवार, 17 नोव्हेंबर 2023 (09:56 IST)
मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी शुक्रवारी मतदान होत आहे. मध्य प्रदेशातील सर्व 230 जागांवर एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. 252 महिलांसह एकूण 2,533 उमेदवार रिंगणात आहेत. छत्तीसगडमध्ये दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यात 70 जागांवरही मतदान होणार आहे. 7 नोव्हेंबर रोजी 20 जागांसाठी मतदान झाले आहे. राज्यातील 70 जागांवर 958 उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत.
 
प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात भाजप आणि काँग्रेसने पूर्ण जोर लावला आहे. मात्र प्रचाराच्या आघाडीवर भाजपने काँग्रेसवर मात केली. आता शुक्रवारी होणाऱ्या मतदानात मतदार आपल्या निर्णयावर ईव्हीएमवर शिक्कामोर्तब करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 36 तर राहुल आणि प्रियंका यांनी 21 सभा घेतल्या आहेत. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सर्वाधिक 160 तर कमलनाथ यांनी 114 सभा घेतल्या आहेत.
 
छत्तीसगडमधील 70 विधानसभा जागांवर दुसऱ्या टप्प्यात आज 17 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. गरीबीबंद जिल्ह्यातील बिंद्रनवागढ ही जागा सोडली तर इतर सर्व जागांवर सकाळी 8 ते सायंकाळी 5 या वेळेत निवडणूक होणार  आहे. 
 











Edited by - Priya Dixit 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती