अबोल तुझे ओठ

बेधुंद मनाला घायाळ करणारे... एकांतपणात मला छळणारे... अबोल ओठांची तुझ्या गुलाबी रंगत...प्रीतीच्या... गुलमोहरा परी रंगलेली... तिची मादक नशा माझ्या रोमा-रोमांत भरलेली...असल्या काही बेधुंद राती... नको करूस वेड्या मनाची दयनीय अवस्था... जगण्यात नाही उरली मजा... दूर झालो तुझ्यापासून एकांत भोगतोय सजा... तरी मनाला- तनाला- नयनाला हवी- हवेशी वाटणारी विलक्षण ओढ... तुझी मला क्षयरोगासारखी क्षणो- क्षणी कुरतडते... व्याकूळ मन तुझ्या भेटीला...तडफडते तुझ्या ओठाची रंगत... रंगलेली अशीच राहू दे...किती दिवस किती राती...?

होतीस माझ्या सोबती... कशा सांगू तुला जुन्या आठवणी.. निवांत बसलो विसरलो झाले गेले. पण तरी डोळ्यातून आसवं गळतात...एकच खंत मनात घर करून राहते... जे अबोल तुझे ओठ... बोलले नाही जे आजवर... सर्व काही दिसत होते... तुझ्या अबोल नजरेत... सावरता सावरलो नाही... तुझ्या रेशमी मिठीत... नजरेपासून केलेस दूर... जाताना अशी माघार... अडखळले शब्द तुझे... झालीस निस्तब्ध... केले मला नजरेत बंध... उधळून गेलीस प्रीतीचा गंध... ना कसली आस आहे... ना कसली प्रीत... तुटले एका क्षणात प्रेम... माझी हार तुझी जी... कळली नाही भाषा मज प्रेमाची... केली नाहीस तू प्रीत ... खोटी बाहानी प्रेमाची... फसलो मी फार... तुझ्या वर-वर दिखाऊ प्रेमाला... अर्थच नाही या जगण्याला... तुझ्या बेदर्दी ओठांना...जे बोलले दोन शब्द मला... केला घात हृदयाचा... दु:ख आले माझ्या वाट्याला... मी दोष नाही देत तुला... फक्त तुझ्या नशिल्या, मादक बेदर्दी ओठाला... ज्यांनी केला माझा विश्वासघात... जे बोलले दोन शब्द मला... ते तुझे अबोल ओठ...

- दत्ता डावरे

वेबदुनिया वर वाचा