कॉंग्रेस हा केवळ राजकीय पक्ष नसून एक विचारप्रवाह असल्याचा भारतीय जनता पक्षाला (भाजप) विसर पडला आहे. हिंदूस्तानातून कॉंग्रेसला संपविण्याची भाषा करणार्या भाजपने पुन्हा भारताचा इतिहास वाचावा. त्यांचा इतिहास कच्चा दिसतोय, अशा शब्दांत कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी टीका केली. कॉंग्रेसने इंग्रजांना प्रेमाने घालवले होते. त्याप्रमाणे भाजपलाही घालवू असेही राहु यांनी औरंगाबादेतील जाहीर सभेत सांगितले.
राहुल गांधी म्हणाले, कॉंग्रेसचा हा विचार राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक आहे. कुराण, गीता या धर्मग्रंथांमध्येही हेच सांगण्यात आले आहे. गुरुनानक आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनीही हिंदूस्तानाला एकात्मतेची शिकवण दिली आहे.