भारतीय जनता पार्टीच्या पीलीभीत मतदार संघातील उमेदवार वरुण गांधी यांनी केलेले भाषण चिंताजनक आणि दोन समाजांमध्ये द्वेष पसरविणारे असून त्यामुळे तरुण पिढीत चुकीचा संदेश जाऊ शकतो, असे मत माजी क्रिकेटर आणि उत्तर प्रदेशातील मुरादाबाद लोकसभा मतदार संघातील कॉंग्रेसचे उमेदवार मोहम्मद अजहरूद्दीन यांनी व्यक्त केले आहे.
मुरादाबाद लोकसभा मतदार संघातून कॉंग्रेसच्या टिकटावर लढत असलेल्या अजहरूद्दीनने सांगितले, की वरुण गांधी सारख्या सुशिक्षित परिवारातील तरुणाने असे वक्तव्य करणे दुःखद आहे.