लखनौतून कॉंग्रेसची रिता बहूगुणा यांना उमेदवारी

लखनौच्या प्रतिष्ठ्ति जागेवर उत्तर प्रदेश कॉंग्रेसने पक्षाच्या प्रदेशाध्यक्षा रिता बहुगुणा-जोशी यांना उमेदवारी दिली आहे. त्यांचा सामना भाजपचे लालजी टंडन व समाजवादी पक्षाच्या नफीसा अली यांच्याशी होईल.

बहूजन समाज पक्षातर्फे या जागेवर पक्षाचे सरचिटणीस अखिलेश दास निवडणूक लढत आहेत. आधी समाजवादी पक्षाने या जागेवरून अभिनेता संजय दत्तची उमेदवारी जाहीर केली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने त्याला निवडणूक लढविण्यास बंदी केल्याने संजयऐवजी नफीसा अली यांना उमेदवारी देण्यात आली.

वेबदुनिया वर वाचा