मोदी पंतप्रधानपदासाठी योग्य उमेदवार: रावल

वार्ता

बुधवार, 8 एप्रिल 2009 (21:57 IST)
उद्योग जगतानंतर आता अभिनेता परेश रावलने गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदासाठी योग्य उमेदवार सांगितले आहे. रावल यांच्या वक्तव्यामुळे भाजपाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार आडवाणी का मोदी असा प्रश्न निर्माण झाला आहे.

भाजपने पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून लालकृष्ण आडवाणी यांचे नाव जाहीर केले आहे. परंतु भाजप उमेदवाराच्या प्रचाराच्या सभेनंतर बोलतांना श्री.रावल यांनी केंद्रात भाजपाची सत्ता येणार असल्याचे सांगितले. मोदी यांची सुस्ती करतांना ते म्हणाले की, मोदीच्या कार्यकाळात गुजरातचा विकास झाला आहे. मोदी ठरविलेले काम पूर्ण करतात. यामुळे त्याच्या शासनाने उल्लेखनीय यश मिळविले आहे.

वेबदुनिया वर वाचा