भारतीय जनता पक्ष आणि बहुजन समाज पक्षाने मिळून वरुण गांधीला हिरो केले आहे. वरुणचे भाषण विश्व हिंदू परिषदेचे आणि संघाचे नेते लिहीत आहे, अशी टीका कॉंग्रेसने केली आहे.
कॉंग्रेसचे महासचिव व उत्तर प्रदेशचे प्रभारी दिग्विजय सिंह यांनी सांगितले की, बसपा सरकारने योग्य पावले उचलली असती तर वरुणच्या अटकेच्या वेळी गोंधळ झाला नसता. परंतु वरुणाला त्यांना हिरो बनवयाचे होते. धर्माच्या आधारावर उत्तरप्रदेशात फूट पाडली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.