आपण पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नाही, पण 'किंगमेकर' मात्र असू असे समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायमसिंह यांनी आज स्पष्ट केले.
मुलायम म्हणाले, की मला पंतप्रधान होण्याची इच्छा नाही, असा याचा अर्थ नाही. राजकारणात आलेल्या प्रत्येकाला हे पद कधी ना कधी भूषवावे असे नक्कीच वाटत असते. पण यावेळी मात्र मी या शर्यतीत नाही. पण लोकसभा निवडणुकीनंतर पंतप्रधान बनविण्यात माझी भूमिका महत्त्वाची असेल.
ते म्हणाले, की पंतप्रधानपदासाठी अनेक नावे समोर येत आहेत. कॉंग्रेस व भाजप आघाडी सत्ता प्राप्त करू शकतील एवढ्या जागा मिळणार नाहीत, हे पक्के आहे. त्यामुळे पुढचा पंतप्रधान कोण असेल हे राष्ट्रीय जनता दल, लोकजनशक्ती पक्ष व समाजवादी पक्ष यांची आघाडी ठरविणार आहे. बिहार व उत्तर प्रदेशात या पक्षांचेच एवढे खासदार असतील की तेच पंतप्रधान ठरवतील.