डाव्यांचे कोणते तोंड खरे? - थरूर

आपली संभावना अमेरिकन व झिओनिस्ट एजंट अशी करणार्‍या डाव्या पक्षांनी संयुक्त राष्ट्रसंघात सरचिटणीसपदासाठी आपल्याला पाठिंबा दिला होता, याकडे कॉंग्रेसचे येथील उमेदवार शशी थरूर यांनी लक्ष वेधले आहे.

संयुक्त राष्ट्रसंघात काम केलेले थरूर आता लोकसभेत जाण्यासाठीची लढाई येथून लढत आहे. त्यांना भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या एका स्थानिक नेत्याशी मुकाबला करावा लागत आहे. 'बाहेरचा' उमेदवार हा शिक्का पुसण्यासाठी आणि आपण मल्याळीच आहोत, हे ठसविण्यासाठी मात्र त्यांना मोठी मेहनत करावी लागत आहे. त्यात त्यांना मल्याळी भाषाही नीट बोलता येत नाही. त्यामुळे त्यांची थोडी अडचण झाली आहे.

डावे आपल्याविरोधात शाब्दिक चर्चा करू शकत नसल्याने बिनबुडाचे आरोप करून विद्वेषी मोहिम राबवित असल्याचा आरोपही थरूर यांनी केला.

आपल्या संयुक्त राष्ट्रसंघातील सरचिटणीसपदाच्या उमेदवारीला अमेरिकेने नकाराधिकाराचा वापर केला, त्यावेळी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस प्रकाश करात यांनी पीपल्स डेमोक्रसी या पक्षाच्या नियतकालिकात लेख लिहून याचा निषेध केला होता. त्याचवेळी मल्याळममधील देशाभिमानी या पक्षाच्या मुखपत्रातही याच आशायाचा लेख प्रसिद्ध झाला होता, याकडे थरूर यांनी लक्ष वेधले आहे.

वेबदुनिया वर वाचा