सपातर्फे भिवंडीतून रघुनाथ पाटील

भिवंडी मतदारसंघातून समाजवादी पक्षाने कॉंग्रेसचे माजी नेते रघुनाथ पाटील यांना मैदानात उतरवले आहे.

समाजवादी पक्षाचे मुंबई अध्यक्ष अबू आझमी यांनी आज ही घोषणा केली. भिवंडीत असलेली मुस्लिम मते, समाजवादी पक्षाशी या समुदायाशी असलेली जवळीक आणि हिंदू असलेले रघुनाथ पाटील ही सारी कारणे पाटील यांच्या उमेदवारी मागे आहेत. पाटील गेल्या तीस वर्षांपासून कॉंग्रेसशी संबंधित आहेत. गेल्या वीस वर्षांपासून ते जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत.

वेबदुनिया वर वाचा