'वरुणः वरून गांधी आतून मोदी'

वरुण गांधी केवळ 'वरून' गांधी आहेत आणि आतून मोदी आहेत. त्‍यांच्‍या नावात गांधी असले तरीही ते मोदी इतकेच हिंसक आहेत. हे आपल्‍याला विसरून चालणार नाही, अशी टीका राष्‍ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे अध्‍यक्ष शदर पवार यांनी केली आहे.

वरुण गांधी यांच्‍या वादग्रस्त भाषणा संदर्भात ते पुणे येथील सभेत त्‍यांनी भाजपा व वरुण गांधी यांच्‍यावर टीकेची झोड उठवली. ते म्हणाले, की वरुण यांची स्थिती पाहिल्‍यानंतर भाजपचे पीएम इन वेटींग अडवाणी त्‍यांची तुलना आजचे जयप्रकाश नारायणन म्हणून करतात हे खरोखरच मोठे दुर्दैव म्‍हणावे लागेल.

वेबदुनिया वर वाचा