पंतप्रधान डॉ.मनमोहनसिंग सर्वात कमकुवत पंतप्रधान आहे. तसेच लालूप्रसाद यादव आणि रामविलास पासवान हे फ्यूज बल्प आहे, अशी टीका बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी केली.
बलिया जिल्ह्यात जनता दल युनायटेडच्या उमेदवाराच्या प्रचार सभेत नितीशकुमार बोलत होते. ते म्हणाले की, कल्याणसिंह यांन समाजवादी पक्षात घेणार्या मुलायमसिंह बरोबर लालू यादव युती करतात. यामुळे त्यांच्या धर्मनिरपेक्षताच्या विचार फोल असल्याचे दिसून येते. लालूप्रसाद आणि पासवान यांची मैत्रीही विचित्र आहे.