लालूंचे विधान शब्दशः घेऊ नये- चिदंबरम

वरूण गांधी यांच्यासंदर्भात राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू प्रसाद यादव यांनी केलेल्या वक्तव्याचा शब्दशः अर्थ घ्यायची गरज नाही, असे केंद्रिय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी म्हटले आहे.

कॉंग्रेस मुख्यालयात आज झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 'मी गृहमंत्री असतो, तर वरूण गांधी यांना रोडरोलरखाली चिरडले असते, असे विधान लालूंनी केले होते. त्यावरून वाद उत्पन्न झाला आहे.

गृहमंत्री या नात्याने कायदेभंग करणार्‍या कोणत्याही व्यक्तीविरूद्ध कायदेशीररित्याच कारवाई झाली पाहिजे, असा आपला आग्रह असल्याचेही चिदंबरम म्हणाले.

वेबदुनिया वर वाचा