भाजप नेते आणि प्रसिद्ध उद्योगपती सुधांशू मित्तल यांच्या निमित्ताने भाजपमध्ये रोज नवनवीन वाद उत्पन्न होत आहेत.
यापूर्वी भाजप नेते अरुण जेटली यांचे मित्तल यांच्याशी मतभेद निर्माण झाल्याने जेटली यांनी राजीनाम्याची तयारी केली होती. हा वाद शमत नाही तोच आता मित्तल यांनी राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांचे भेट घेतल्यानंतर मित्तल यांना राजस्थानचे निवडणुक प्रभारी हा चार्ज देण्यात आल्याचे वृत्त आल्याने अनेक नेते नाराज झाले आहेत.
हे वृत्त प्रसार माध्यमात पसरताच भाजप नेत्यांनी पत्रकारपरिषद घेत मित्तल यांना राजस्थानचे प्रभारी करण्यात आले नसल्याचे जाहीर करण्यास सुरुवात केली आहे.