मायावती लवकरच तुरुंगातः मुलायम

उत्तर प्रदेशच्‍या मुख्यमंत्री मायावती यांनी इतका मोठा भ्रष्‍टाचार केला आहे, की त्‍यांची चौकशी झाली तर मायावती तुरुंगात असतील, असा आरोप समाजवादी पार्टीचे अध्यक्ष मुलायम सिंह यादव यांनी केला आहे. मायावती यांच्‍या भ्रष्‍टाचाराचे सर्वपुरावे आपल्‍याकडे असून निवडणुकांनंतर आपण ते जाहीर करू असेही त्‍यांनी जाहीर केले आहे.

वेबदुनिया वर वाचा