महाराष्ट्र कॉग्रेसमध्ये बंडखोरी

वेबदुनिया

रविवार, 5 एप्रिल 2009 (12:46 IST)
मतभेद आणि वादाने खंगलेल्या महाराष्ट्र कॉग्रेसला निवडणुकांपूर्वी मोठा धक्का बसला असून, उत्तर मुंबईतील आमदार पी यू मेहता यांच्यासह त्यांच्या 10 समर्थक कॉग्रेस नगर सेवकांनी राजीनामा देत बंडाचे निशाण उभारले आहे.

उत्तर मुंबईतील जागेवरून निवडणुक लढवण्यावरून हा वाद निर्माण झाला असून, या जागेवर संजय निरुपम यांना तिकिट देण्यात आल्याने मेहता आणि समर्थक नाराज आहेत.

यापूर्वी 2004मध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये बॉलीवूड कलाकार गोविंदा कॉग्रेसच्या तिकिटावर विजयी झाला होता. यानंतर ही जागा कायम वादातच अडकलेली आहे.

स्थानिक नेत्याला या जागेवर उमेदवारी देण्याची मागणी येथील कार्यकर्त्यांनी केली असताना निरुपम यांना तिकिट देण्यात आल्याने कार्यकर्ते नाराज असून, पी यू मेहता यांना उमेदवारी देण्याची मागणी त्यांनी केली आहे.

आज पहाटे अचानक मेहता आणि समर्थकांनी आपण राजीनामा देत असल्याचे जाहीर केल्याने कॉग्रेस गोटात खळबळ उडाली आहे.

वेबदुनिया वर वाचा