कॉंग्रेसला शिवसेनेचे 'काय हे' उत्तर

यंदाचा लोकसभा निवडणुकीचा प्रचार कॉंग्रेसने संगीतमय केला असून ए. आर. रहमानच्‍या 'जय हो' हे गीत प्रचारासाठी वापरले जात आहे. तर शिवसेना-भाजपा युतीने या गीतास उत्तर देण्‍यासाठी मराठीतून 'काय हे...' हे गीत उतरविले आहे.

नुकत्याच शिवसेना-भाजपाच्‍या संयुक्त सभेत शिवाजी पार्कवर हे गाणे वाजविण्‍यात आले होते. हे गीत गायक आणि संगीतकार अवधूत गुप्ते यांनी तयार केले असून या गीतातून मुंबईवरील हल्‍ला, दहशतवादी हल्‍ले, क्रिकेट मैदानात चीयरलीडर्स, शेतक-यांची हत्‍या आणि भारनियमन हे मुद्दे घेण्‍यात आले आहेत.

वेबदुनिया वर वाचा