पक्षांतर्गत विरोधानंतरही कॉंग्रेसकडून पुन्हा उमेदवारी पदरात पाडून घेण्यात यशस्वी ठरलेल्या सुरेश कलमाडी यांनी आज पुणे लोकसभा मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केला.
कलमाडी यांच्या विरोधात भाजपाचे अनिल शिरोळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शिरोळेंनी यापूर्वीच उमेदवारी अर्ज दाखल केला असून यंदा लढत चुरशीची होण्याची शक्यता आहे.
याशिवाय पुणे लोकसभा मतदार संघातून रणजीत शिरोळे मनसेकडून तर डी. एस कुलकर्णी बसपाकडून मैदानात उतरणार आहेत.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत चार एप्रिल आहे.