सध्या देशात सर्वत्र लोकसभा निवडणुकीसाठी प्रचार सभा होत आहे. प्रत्येक पक्ष एकमेकांवर शाब्दिक बाणांचे हल्ले करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुणे, बारामती, शिरूर आणि मावळ लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी येत्या 29 एप्रिल रोजी महाविजय संकल्प सभेचे आयोजन करण्यात आले आहे. ही सभा वानवडी येथील रेसकोर्स मैदान येथे सायंकाळी 5:30 वाजता होणार आहे. या सभेला महायुतीचे सुमारे 2 लाख कार्यकर्त्ये उपस्थित राहणार अशी माहिती प्रदेश भाजपचे उपाध्यक्ष राजेश पांडे यांनी दिली.
पांडे म्हणाले, पुण्यात अनेक वर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा रेसकोर्स रोड येथे होणार आहे. ही सभा 128 एकर मध्ये होणार आहे. 21 विधानसभा मतदारसंघातून कार्यकर्त्ये या सभेसाठी येणार.या सभेच्या माध्यमातून महायुतीतील चारही उमेदवारांची महाविजय संकल्प सभा असणार आहे. या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री चंद्रकांत पाटील, विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, मनसेचे युवा नेते अमित ठाकरे आणि 3 हजार व्हीआयपी या सभेला उपस्थित राहणार.